Wednesday, January 4, 2017
डिजिटल व्यवहारांसाठी निशुल्क हेल्पलाइन क्र. 1444...
डिजिटल व्यवहारांसाठी निशुल्क हेल्पलाइन क्र. 1444...
केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या *भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्नांवर उत्तरे मिळणार* आहेत. ही हेल्पलाइन देशाच्या उत्तर, तसेच पूर्व भागातही इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे.
या हेल्पलाइनवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्नांवर उत्तरे मिळणार आहेत. ही हेल्पलाइन देशाच्या उत्तर, तसेच पूर्व भागातही इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे. लवकरच *सर्व भारतीय भाषांमध्ये ती सुरू करण्यात आले* आहे. सर्व दूरसंचार कंपन्या या हेल्पलाइनमध्ये सहभागी असल्याने सर्वच कंपन्यांच्या ग्राहकांना ही हेल्पलाइन उपलब्ध असेल.
©पद्मकमळ
महाराष्ट्र मानवी हक्क आयोग एका क्लीकवर वेबसाइटवर मिळणार माहिती...
▬▬▬▬ஜ۩🅿۩ஜ▬▬▬▬
महाराष्ट्र मानवी हक्क आयोग एका क्लीकवर वेबसाइटवर मिळणार माहिती...
आता महाराष्ट्र मानवी हक्क आयोग पूर्णपणे हायटेक झालं असून, तुमचे अधिकार काय याची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला कुठल्याही अधिवक्ता अथवा एक्सपर्ट कडे जाण्याची गरज नाही. कारण आता मानवी हक्काची माहिती एका क्लीकवर महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या वेबसाइटवर मिळणार आहे. ही माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत असणार आहे. सोबतच मानवी हक्क आयोगाच्या नवीन नवीन निर्णयाची माहिती वेबसाइटवर दिली जाणार आहे. तसेच कोणताही अर्ज कसा करायचा आणि कुठे द्यायचा याबद्दल सुद्धा माहिती दिली जाणार आहे.
महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष मानवी हक्क आयोगाच्या अंतर्गत कोण कोणत्या तक्रारी येतात. आणि कोणत्या नाही याबद्दल सुद्धा सांगण्यात आले आहे, जेणेकरून तक्रारकर्त्याला माहित असावं की मानवी हक्क आयोग अंतर्गत कोणती तक्रार करता येणार आणि कोणती नाही.
ही वेबसाइट आठ भागांमध्ये वर्गीकृत करण्यात आली आहे. त्यामुळं तुमचे अधिकार काय याची माहिती हवी असेल तर या लिंकवर *http://www.mshrc.online/index.php* क्लिक करून तुम्ही माहिती मिळवू शकता.
©पद्मकमळ
Monday, January 2, 2017
सीएनजी स्कूटर वापरा, परीक्षेत मार्क्स वाढवा!
सीएनजी स्कूटर वापरा, परीक्षेत मार्क्स वाढवा!
सीएनजी स्कूटर वापरा, परीक्षेत मार्क्स वाढवा अशी नवी योजना लवकरच राज्यात सुरु होणार आहे.
जे विद्यार्थी ग्रीन एनर्जी प्रणालीचा वापर आपल्या दुचाकीमध्ये करतील. त्या *पर्यावरण रक्षक विद्यार्थ्यांना अंतिम परिक्षेत जास्त गुण* देण्याचा शिक्षण विभाग विचार करणार आहे.
त्यामुळे स्पर्धात्मक परिक्षेत या वाढीव गुणांचा विद्यार्थ्यांना फायदा होईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे, यांनी सांगितले.
©पद्मकमळ
Sunday, January 1, 2017
नवीन वर्षाचे स्वागत स्वस्ताईने! बँकांकडून नवीन वर्षाचं गिफ्ट, व्याजदरात मोठी कपात...
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
नवीन वर्षाचे स्वागत स्वस्ताईने!
बँकांकडून नवीन वर्षाचं गिफ्ट, व्याजदरात मोठी कपात...
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरात 0.90 टक्क्यांनी कपात केली आहे. 1 जानेवारी 2017 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती एसबीआयने दिली आहे. यामुळे ग्राहकांचे *वाहन कर्ज, गृहकर्जाचे हफ्ते कमी होतील.* लेंडिंग रेटमध्ये 8.90 टक्क्यांवरुन 8 टक्के एवढी कपात करण्यात आली आहे.
*एसबीआय सह युनियन बँक ऑफ इंडियानेही आता एसबीआय, आयडीबीआय, पीएनबी आणि त्रावणकोर बँकेनंतर व्याजदरात कपात केली.* यूनियन बँकेने लेंडिंग दरात 0.90 टक्के कपात. पीएनबीने गृहकर्जाच्या दरात 0.7 टक्क्यांनी कपात आयडीबीआयनेही व्याजावर 0.60 टक्के कपात केली आहे. नोटाबंदीनंतर बँकात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्यामुळे बँकांनी हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणामध्ये नोटाबंदीने व्याजदर कमी होतील, असा अंदाज वर्तवला होता.
©पद्मकमळ