Wednesday, April 26, 2017

कामगार कायदा आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही लागूः* कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख.

*कामगार कायदा आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही लागूः* कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख.

राज्यातील विविध सहकारी संस्थामध्ये सुरक्षा रक्षक आणि कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले. सदर *कायद्याद्वारे मिळणारे विविध लाभ प्राप्त करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचवण्यासाठी हा कामगार कायदा आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही लागू करण्यात येणार.*
त्यामुळेच अशा खासगी सुरक्षा रक्षकांची नोंदणी संस्थांच्या कार्यकक्षेत आणली जाणार आहे. त्यामुळेच अशा सुरक्षा रक्षकांना संरक्षण देण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी केल्याने अंमलबजावणी यंत्रणा सक्षम होऊ शकेल.

ज्या कारखान्यात व आस्थापनेत खाजगी संस्थेमार्फत सुरक्षा रक्षक नेमण्‍यात येत आहेत. यांची नोंदणी करण्याकरिता लगतच्या *दिवसात ६० दिवस व त्यापेक्षा जास्त दिवस काम केले आहे त्यांनी मंडळाकरिता नोंदणी अर्ज करावे* जेणे करुन त्यांची नोंदणी होईल. अशी नोंदणी न करणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळांवर व आस्थापनेच्या मुख्य मालकावर गृह विभागातर्फे कारवाई करण्यात येईल.

*©पद्मकमळ*

Monday, April 3, 2017

एसबीआय कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के कपात...

*एसबीआय कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के कपात...*

स्टेट बँकेने कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के इतकी कपात केली असून प्रमाण व्याजदर 9.10 टक्के केला आहे.  यामुळे वाहन कर्जे व गृहकर्जासारखी कर्जे स्वस्त होतील आणि आधीच्या कर्जदारांचाही हप्ता कमी होईल.

या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेची ही व्याजदर कपात सूचक मानण्यात येत आहे. स्टेट बँकेचा कर्ज देण्यासाठी असलेला आधार दर किंवा प्रमाण दर *9.25 टक्के होता जो आता 1 एप्रिलपासून 9.10 टक्के* झाला आहे.

*©पद्मकमळ*

Saturday, April 1, 2017

यंत्रमागात सबसिडी 30 टक्यांनी वाढ- स्मृती इराण

*°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°*
*यंत्रमागात सबसिडी 30 टक्यांनी वाढ- स्मृती इराणी*

*राज्यातील यंत्रमागांसाठी वीज दर सवलतीसंदर्भात योजनेची आखणी- मुख्यमंत्री*

यंत्रमागाचा दर्जा वाढविताना देण्यात येणारी सबसिडी 30 टक्यांनी वाढविली आहे, *ग्रुप वर्क शेड* या योजनेत कामगारांसाठी विश्रांती घेण्यासाठी व राहण्यासाठी व्यवस्था असेल, आता *11 जण एकत्र येऊन यार्न बँक स्थापन करु शकतात.* अशी बँक आता ज्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही अशा व्यक्ती देखील स्थापन करु शकतील. यासाठीची गॅरंटी कमी करून 25 टक्के केली आहे, यात कॉमन सर्व्हिस सेंटर्स असतील, *प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देतांना 4 टक्के इतक्या कमी व्याज* दराने परतफेड करता येईल 1 लाख रुपयांचा मार्जीन मनी देखील शासन देईल. लवकरच पॉवरटेक्स चे एक मोबाईल एप काढण्यात येऊन त्यातून या योजनेची सर्व प्रकारची माहिती देण्यात येईल.

१८००२२२०१७ या पॉवरटेक्स हेल्पलाईन.

*©पद्मकमळ*