*एसबीआय कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के कपात...*
स्टेट बँकेने कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के इतकी कपात केली असून प्रमाण व्याजदर 9.10 टक्के केला आहे. यामुळे वाहन कर्जे व गृहकर्जासारखी कर्जे स्वस्त होतील आणि आधीच्या कर्जदारांचाही हप्ता कमी होईल.
या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेची ही व्याजदर कपात सूचक मानण्यात येत आहे. स्टेट बँकेचा कर्ज देण्यासाठी असलेला आधार दर किंवा प्रमाण दर *9.25 टक्के होता जो आता 1 एप्रिलपासून 9.10 टक्के* झाला आहे.
*©पद्मकमळ*
No comments:
Post a Comment