*कामगार कायदा आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही लागूः* कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख.
राज्यातील विविध सहकारी संस्थामध्ये सुरक्षा रक्षक आणि कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले. सदर *कायद्याद्वारे मिळणारे विविध लाभ प्राप्त करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचवण्यासाठी हा कामगार कायदा आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही लागू करण्यात येणार.*
त्यामुळेच अशा खासगी सुरक्षा रक्षकांची नोंदणी संस्थांच्या कार्यकक्षेत आणली जाणार आहे. त्यामुळेच अशा सुरक्षा रक्षकांना संरक्षण देण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी केल्याने अंमलबजावणी यंत्रणा सक्षम होऊ शकेल.
ज्या कारखान्यात व आस्थापनेत खाजगी संस्थेमार्फत सुरक्षा रक्षक नेमण्यात येत आहेत. यांची नोंदणी करण्याकरिता लगतच्या *दिवसात ६० दिवस व त्यापेक्षा जास्त दिवस काम केले आहे त्यांनी मंडळाकरिता नोंदणी अर्ज करावे* जेणे करुन त्यांची नोंदणी होईल. अशी नोंदणी न करणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळांवर व आस्थापनेच्या मुख्य मालकावर गृह विभागातर्फे कारवाई करण्यात येईल.
*©पद्मकमळ*
No comments:
Post a Comment