Thursday, March 30, 2017

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी तीन महिन्यात मंडळः* कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख

*असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी तीन महिन्यात मंडळः* कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख

*पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांनाही या मंडळाचा लाभ मिळेल*

कल्याणासाठी सर्वकष योजना आणण्याचे आश्वासन; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी एक सर्वंकष योजना तयार केली जाईल आणि त्यांच्यासाठी पडून असणाऱ्या निधीचा योग्य वापर केला जाईल तशा सूचना कामगार आयुक्तांना दिल्या जातील व दोन महिन्यात योजना तयार केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधानसभेत संतोष दानवे, सुरेश हळवणकर आदिंनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत हस्तक्षेप करताना ते बोलत होते. बांधकाम क्षेत्रातील तसेच मोलकरणी आदिंसाठी असणारा निधी मिळत नाही अशा तक्रारी भारती लव्हेकर, मेधा कुलकर्णी आदिंनी केल्या. त्यांना *कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी उत्तर देताना सांगितले की शेतमजूर, यंत्रमाग कामगारांसाठी तसेच सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी तीन महिन्यात मंडळ केले जाईल.* विकासकांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचे अडीच कोटी रुपये मंडळाकडे जमा असल्याचेही राज्यमंत्री देशमुख  म्हणाले.

राज्यात *असंघठीत कामगारांची 122 उद्योगांची यादी असून जवळपास 399 कोटी असंघठीत कामगार* काम करत असल्याची माहिती ना. देशमुख यांनी यावेळी दिली. यावेळी *पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांनाही या मंडळाचा लाभ* मिळेल असेही त्यांनी उत्तरात सांगितले.

*©पद्मकमळ*

Wednesday, March 29, 2017

खासगी कॉलेजांची फी २० टक्क्यांनी होणार कमी!

*सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना. देशमुख यांच्या पाठपुरावास यश..*

*महाविद्यालयीन शुल्क कमी होणार..!*

*खासगी कॉलेजांची फी २० टक्क्यांनी होणार कमी!*

खासगी महाविद्यालयातील वैद्यकीय, इंजिनियरिंग, आर्किटेक्चर आणि एमबीएसह इतर अभ्यासक्रमांचे शुल्क 20 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्याच्या शुल्क नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, *येत्या शैक्षणिक वर्षापासून ही फी कपात* लागू होणार आहे.

राज्यभरात तीन हजार खासगी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय, इंजिनियरिंग, एमसीए, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, कायदा, आर्किटेक्चर असे सहा हजार अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांसाठी लाखो रुपये फी मोजावी लागते. त्यातच प्रथम वर्षानंतर ही फी 7 टक्क्यांपर्यत वाढते. यामुळे अनेक पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागते. या अभ्यासक्रमांची फी कमी करण्याची मागणी *काही दिवसापूर्वी पालक आणि विद्यार्थी व विद्यार्थी  संघटनानी मा. पालकमंत्री देशमुख यांच्याकडे केली होती.* या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खासगी महाविद्यालयातील या अभ्यासक्रमांची फी निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या शिक्षण शुल्क समितीत बदल केला. त्यानंतर *शुल्क नियामक प्राधिकरणाची स्थापना* करण्यात आली. यात समितीने हा निर्णय घेतला आहे.

*©पद्मकमळ*

सहस्त्रचंडी यागम् पहिला दिवस

🔥 *|| सहस्त्रचंडी यागम् ||* 🔥
     ╰═════════════╯
*दि. २९/३/२०१७ चैत्र शुद्ध द्वितीया बुधवार रोजी सकाळी ८ वा.*

*मा. नगरसेवक नागेश वल्याळ व मा.नगरसेवक उमेश मामड्याल यांच्या शुभहस्ते मंडप प्रवेश, मंडप देवता पूजन,* शुध्दीकरण, पुण्यावाचन, नक्षत्र, नवग्रह, पवदुर्गा पूजनम, अंकूरारोपण, शोढषमातृका,
सत्तमातृका, आवाहान पूजन, आराधना, क्षेत्रपाल, भैरव, स्थानदेवता, सर्वतोभद्रा मंडळ, लिंगतोभद्रा मंडळ पूजनम, सर्वदेवता आवाहान देवतापुजन.
पद्मशाली पुरोहीत संघम यांच्या नेतृत्वाखाली करणेत आला.

*दुर्गा सप्तशती पारायण अपर्णा कल्याणी, मेघना फडके, मंगल पाटील.*

*नगरसेवक अविनाश बोमड्याल व श्रीनिवास नल्ला यांच्या हस्ते पंच महाआरती* करुन उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.

*असंंख्य भक्तगण महिला नागरिक सहकुटुंब- सहपरिवार उपस्थिती होते.*

-------+----------+---------+--------+----
*(समस्त सहस्त्र चंडी याग समिती)*
...............................................
🇴 🇴 🇴 🇴 🇴 🇴 🇴 🇴

Tuesday, March 28, 2017

दि. २९/३/२०१७ चैत्र शुद्ध द्वितीया बुधवार रोजी सकाळी ८ वा.

╭════════════╮
  🔥 *|| सहस्त्रचंडी यागम् ||* 🔥
      ╰═════════════╯
*दि. २९/३/२०१७ चैत्र शुद्ध द्वितीया बुधवार रोजी सकाळी ८ वा.*

मंडप प्रवेश, मंडप देवता पूजन, शुध्दीकरण, पुण्यावाचन, नक्षत्र, नवग्रह, पवदुर्गा पूजनम, अंकूरारोपण, शोढषमातृका, सत्तमातृका, आवाहान पूजन, आराधना, क्षेत्रपाल, भैरव, स्थानदेवता, सर्वतोभद्रा मंडळ, लिंगतोभद्रा मंडळ पूजनम, सर्वदेवता आवाहान देवतापुजन.

*सहकुटुंब- सहपरिवार उपस्थिती रहावे.*

*दिनांकः* २९/३/१७ ते ५/४/१७
*वेळः* सकाळी ०८ ते दुपारी १२ पर्यंत
*स्थळः* कुचन प्रशाला, रविवार पेठ, सोलापूर. *संपर्कः* ०९९२११४०९९९

-------+----------+---------+--------+----
*(समस्त सहस्त्र चंडी याग समिती)*
...............................................
🇴 🇴 🇴 🇴 🇴 🇴 🇴 🇴

Saturday, March 25, 2017

राष्ट्रीय वयोश्री योजना...


*राष्ट्रीय वयोश्री योजना बीपीएल कुटुंबांना मोदी सरकारची नवीन योजना...*

केंद्र शासन पुरस्कृत योजना,
दारिद्र्यरेषेखालील लोकांना केंद्र सरकार राष्ट्रीय योजना सुरू करण्यात आले. योजना देशातील फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी  आहे.

*राष्ट्रीय बीपीएल कुटुंबांना आरोग्य संबंधित उपकरणेः-*
१.चष्मा
२.चाकांची खुर्ची
३.श्रवण संबंधित उपकरणे
४.आरामदायक बूट
५.खोटे दात सेट करा
६.ट्रायपॉड
७.लोको मोटर व इतर.

ज्येष्ठ नागरिकांना 2000 योजना साधने देण्यात येईल. वय 60 वर्षे आणि जुन्या बीपीएल वर्गात असणे आवश्यक आहे 2011 च्या जनगणनेनुसार, राष्ट्राच्या वृद्ध, या 10,38 दशलक्ष जे *5.2% अपंग वृद्ध लोक* आहेत

*©पद्मकमळ*

Sunday, March 19, 2017

पहिल्यांदाच अर्थसंकल्पात एसटीसाठी ‘ऐतिहासिक’ तरतूद...* परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख


पहिल्यांदाच अर्थसंकल्पात एसटीसाठी ‘ऐतिहासिक’ तरतूद...* परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख

राज्य सरकारने या वर्षी एसटी बसस्थानक आधुनिकीकरणासाठी १८ कोटी ४० लाख, सरकारकडून प्रलंबित असलेल्या *सवलतीतील १४०० कोटी आणि एसटी महामंडळाला भांडवली अंशदान म्हणून ५३१ कोटी* इतक्या रक्कमेची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. एसटी महामंडळाला पहिल्यांदाच इतकी मोठी आर्थिक मदत अर्थसंकल्पातून मिळत असल्याने महामंडळाला त्याचा फायदा होणार आहे.

एसटीच्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा ही तरतूद केली आहे. परिवहन मंत्री व राज्यमंत्री यांनी त्यासाठी प्रयत्न केले. गेल्या वर्षी *बसस्थानक आधुनिकीकरण ९६ कोटी, सवलत रक्कम १३०५ कोटी रु. आणि भागभांडवल ४१९ कोटी* एवढी रक्कम महामंडळाला मिळाली होती. या वर्षीही पुन्हा अर्थसंकल्पात चांगली मदत मिळल्याने तोट्यातील एसटी महामंडळाला उभारी मिळणार आहे.

©पद्मकमळ

Tuesday, March 14, 2017

मुंबईतील पहिल्या तरंगत्या ‘फ्लोटेल’...

*मुंबईतील पहिल्या तरंगत्या ‘फ्लोटेल’...*
   
मुंबईतील पहिल्या तरंगत्या हॉटेलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गोव्याच्या धर्तीवर मुंबईतही पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने तरंगते हॉटेल अर्थात फ्लोटेल सुरु करण्यात आले आहे.

वांद्रे रेक्लमेशनजवळ हे हॉटेल सुरु करण्यात आले आहे. एबी सेलेस्टियल या खासगी कंपनीने हे हॉटेल सुरु केले असून डब्ल्यूबी इंटरनॅशनल कन्सल्टंटनेही यात सहकार्य केले आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फ्लोटेलचे उद्घाटन करण्यात आले. वांद्रे-वरळी सीलिंकला लागूनच असलेल्या महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या जेटीवर हे तरंगते हॉटेल उभे राहिले आहे.

*©पद्मकमळ*

Monday, March 6, 2017

विशेष आभार

//////////////////////////////////////////////

        🙏👏 विशेष आभार🙏👏

"विजयी झाल्यावर तर सर्वांचं कौतुक होतच पण जे पराभूत झाले यांना ह्या वेळी धीर देणे खूप महत्वाचे असते."

जे निवडणुकी मध्ये पराभूत झाले अशा सर्व उमेदवारांसाठी एका निवडणुकीचा पराभवाने खचू नका.

'एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता'

खरा लढवय्या तोच असतो जो पुन्हा पुन्हा संघर्ष करून फिनिक्स पक्षाप्रमाणे हवेत उंच भरारी घेतो.

हेच ओळखून..

मा. पालकमंत्री
विजयकुमार देशमुख
व भाजपा शहर अध्यक्ष
प्रा. अशोक निंबर्गी सर व शहरातील नेतेगण व पदाधिकार्यांनी विजयी उमेदवार सोबत पराजय उमेदवारांचे सत्कार घडवून आणले.

या सर्वांचे विशेष आभार...

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©पद्मकमळ

भाजपा कार्यकर्ता

*भाजपा  कार्यकर्ता म्हणजे काय ?*

अनुकूल दिवसात दिसणारी शंभर डोकी म्हणजे कार्यकर्ता नाही...तर....प्रतिकूल दिवसात साथ देणारे... काही मोजके सहकारी...म्हणजे

*भाजपा कार्यकर्ता*

हवेबरोबर तोंड फिरवणारी १०० वातकुक्कुट डोकी म्हणजे कार्यकर्ता नव्हे......तर वादळातही ठामपणे पाय रोवून आपल्या ध्येयाशी इमान राखणारे शिलेदार म्हणजे

*भाजपा कार्यकर्ता*

सामाजिक क्षेत्रात वावरताना मानापमान .....राग-लोभ ....आरोप-प्रत्यारोप होणारच.......वैचारिक मतभेद तर अपरिहार्य.... परंतु ..... अनेक अडचणींना तोंड देऊन.... जे  काही टिकून राहतात ते म्हणजे

*भाजपा कार्यकर्ता*

*संघटित रहा.....बोलते रहा.....*
       सतीष महाले