लवकरच महामेळावा वासोलापूर
निवडणुका आल्या की तेलुगु समाजाला गोंजारण्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांसह अन्य पक्षसंघटना आघाडीवर असतात. मात्र, ज्यावेळी संधी द्यायची वेळ येते; त्यावेळी राजकीय अडथळे आणून तेलुगुजनांना पध्दतशीरपणे लांब ठेवले जाते. याबाबतचा अनुभव सोलापूरसह देशभरात येत आहे. तद्वत, या प्रथेला मुठमाती देण्याकामी 'तेलुगुबिड्डा लेवरा, राजकीयम् कदलीयरा...' अर्थात 'तेलुगु सुपुत्रा उठ आणि राजकीय सुत्रे हलव' असा थेट संदेश सोलापुरात झालेल्या एका बैठकीत देण्यात आला.
त्याचे असे की, देशभरातील तेलुगु बांधवांना राजकीय प्रवाहात योग्य व मानाचं स्थान देण्याच्या भुमिकेने भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जनरल सेक्रेटरी के. मुरलीधरराव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा यांसह देशभरातील तेलुगुबहुल भागातील लोकांना एकत्रित करून ज्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार संधी देण्याच्या अनुषंगाने ही समिती कार्यरत राहणार आहे. याचाच एक भाग म्हणून बद्दम महिपालरेड्डी यांना सोलापुरात पाचारण करून येथील तेलुगुभाषिक समाजसंघटना आणि राजकीय परिस्थिती याविषयी धांडोळा घेण्यात आला. राजेश बाटला यांच्याकडे सोलापूरचे प्रभारीपद असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लवकरच चार लाख तेलुगुबांधवांचा महामेळावा घेण्यात येणार असल्याचे डॉ. फडकुले सभागृह येथे झालेल्या तेलुगू समाज वेदिकाच्या बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली टीम सोलापुरात येवून गेल्याने येथील तेलुगुजनांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मल्लिकार्जून कमटम हे होते. यावेळी नगरसेवकद्वय पांडुरंग दिड्डी, कृष्णाहरी दुस्सा, नागेश वल्याळ, नगरसेविकाद्वय इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष यल्लप्पा येलदी, लेबर फेडरेशनचे संचालक शंकर चौगुले, मनोहर मुधोळकर, मधुकर वडनाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी प्रास्ताविक केले. सदानंद गुंडेटी यांनी आभार मानले. याप्रसंगी नारायण आडकी, गोपी मुदगल, आनंद बिरू, गंगाधर गुल्लापल्ली, प्रा. व्यंकटेश पडाल, विजय इप्पाकायल, प्रभाकर गणपा, व्यंकटेश दोंता, लक्ष्मीकांत गड्डम, रामकृष्ण गुन्नाल, व्यंकटेश कोंडी यांच्यासह पद्मशाली, वडार, नीलकंठ, श्रीमद्वीरशैव कुरहिनशेट्टी, कुरुहिनशेट्टी, नीलगार असे सुमारे २४ तेलुगुभाषिक समाजातील बंधू-भगिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
©पद्मकमळ
Please google translate use.
Please google translate use.