Tuesday, August 25, 2015

तेलुगू समाज वेदिका बैठकीत 'तेलुगुबिड्डा लेवरा, राजकीयम् कदलीयरा...' अर्थात 'तेलुगु सुपुत्रा उठ आणि राजकीय सुत्रे हलव' 


लवकरच महामेळावा वासोलापूर 

निवडणुका आल्या की तेलुगु समाजाला गोंजारण्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी यांसह अन्य पक्षसंघटना आघाडीवर असतात. मात्र, ज्यावेळी संधी द्यायची वेळ येते; त्यावेळी राजकीय अडथळे आणून तेलुगुजनांना पध्दतशीरपणे लांब ठेवले जाते. याबाबतचा अनुभव सोलापूरसह देशभरात येत आहे. तद्वत, या प्रथेला मुठमाती देण्याकामी 'तेलुगुबिड्डा लेवरा, राजकीयम् कदलीयरा...' अर्थात 'तेलुगु सुपुत्रा उठ आणि राजकीय सुत्रे हलव' असा थेट संदेश सोलापुरात झालेल्या एका बैठकीत देण्यात आला.

त्याचे असे की, देशभरातील तेलुगु बांधवांना राजकीय प्रवाहात योग्य व मानाचं स्थान देण्याच्या भुमिकेने भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जनरल सेक्रेटरी के. मुरलीधरराव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा यांसह देशभरातील तेलुगुबहुल भागातील लोकांना एकत्रित करून ज्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार संधी देण्याच्या अनुषंगाने ही समिती कार्यरत राहणार आहे. याचाच एक भाग म्हणून बद्दम महिपालरेड्डी यांना सोलापुरात पाचारण करून येथील तेलुगुभाषिक समाजसंघटना आणि राजकीय परिस्थिती याविषयी धांडोळा घेण्यात आला. राजेश बाटला यांच्याकडे सोलापूरचे प्रभारीपद असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लवकरच चार लाख तेलुगुबांधवांचा महामेळावा घेण्यात येणार असल्याचे डॉ. फडकुले सभागृह येथे झालेल्या तेलुगू समाज वेदिकाच्या बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली टीम सोलापुरात येवून गेल्याने येथील तेलुगुजनांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मल्लिकार्जून कमटम हे होते. यावेळी नगरसेवकद्वय पांडुरंग दिड्डी, कृष्णाहरी दुस्सा, नागेश वल्याळ, नगरसेविकाद्वय इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष यल्लप्पा येलदी, लेबर फेडरेशनचे संचालक शंकर चौगुले, मनोहर मुधोळकर, मधुकर वडनाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी प्रास्ताविक केले. सदानंद गुंडेटी यांनी आभार मानले. याप्रसंगी नारायण आडकी, गोपी मुदगल, आनंद बिरू, गंगाधर गुल्लापल्ली, प्रा. व्यंकटेश पडाल, विजय इप्पाकायल, प्रभाकर गणपा, व्यंकटेश दोंता, लक्ष्मीकांत गड्डम, रामकृष्ण गुन्नाल, व्यंकटेश कोंडी यांच्यासह पद्मशाली, वडार, नीलकंठ, श्रीमद्वीरशैव कुरहिनशेट्टी, कुरुहिनशेट्टी, नीलगार असे सुमारे २४ तेलुगुभाषिक समाजातील बंधू-भगिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 
©पद्मकमळ
 Please google translate use.

4 comments:

  1. *रेल्वे देणार केवळ ९२ पैशांत १० लाखांचा विमा...*

    *तिकीट विकत घेतानाच तुम्हाला तुमच्या नॉमिनीचे नाव द्यावे लागेल.*


    *जगातील सर्वात स्वस्त विमा योजना म्हणून गौरव होईल अशीच ही योजना*


    ऑनलाइन तिकीट बुकिंग केल्यानंतर ९२ पैशांमध्ये १० लाखांचा विमा मिळेल असे भारतीय रेल्वेने म्हटले आहे. प्रवाशांना या *योजनेचा फायदा ३१ ऑगस्टपासून मिळणार* आहे. रेल्वेनी श्रीराम जनरल इंश्युरंस कंपनी, आईसीआईसीआई लोम्बार्ड जनरल इंश्युरंस कंपनी आणि रॉयल सुंदरम जनरल इंश्युरंस कंपनी यांच्याशी करार केले आहेत.

    रेल्वेचे तिकीट बुक केल्यानंतर ९२ पैसे देऊन या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीला निवडावे लागेल. विशेष म्हणजे, जे प्रवासी *मासिक तत्वाचा पास काढतात त्यांच्यासाठी सुद्धा* ही योजना आहे परंतु त्यांना वर्षाला पाससोबत २००-३०० रुपये जास्त द्यावे लागतील असे रेल्वेनी म्हटले आहे.

    *तिकीट विकत घेतानाच तुम्हाला तुमच्या नॉमिनीचे नाव द्यावे लागेल.* ही जगातील सर्वात स्वस्त विमा योजना आहे की नाही याबाबत अजून आकडेवारी उपलब्ध नसली तरी अत्यंत कमी प्रिमियम भरून *१० लाख भरपाई मिळेल* अशी ही पहिलीच योजना असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

    *©पद्मकमळ*

    ReplyDelete
  2. *यंत्रमागधारकांना ५० टक्के व्याज सवलत: वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख...*

    राज्यातील यंत्रमागधारकांच्या कर्जाचे पुनर्गठन करून ५० टक्के व्याज सवलत, कर्नाटक आणि इतर राज्याप्रमाणे प्रती युनिट एक रूपये दराने वीज पुरवठा यासह अन्य मागण्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून या प्रश्नांवर लवकरच प्रस्ताव तयार करून कॅबिनेट मंत्रीमंडळासमोर सादर करण्याची घोषणा राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

    *देशातील यंत्रमागापैकी एकट्या महाराष्ट्र राज्यात ५० टक्के यंत्रमाग* असून त्यावर लाखो कुटूंबांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या उदरनिर्वाह अवलंबून आहे. परंतु, मागील तीन वर्षांपासून पडलेला दुष्काळ, कापसाची व सुताची टंचाई, मंदीमुळे अडचणीत आलेला यंत्रमाग उद्योग, वाढते वीजदर, उत्पादीत मालाला उठाव नसणे यामुळे कर्ज व व्याजास कंटाळून इचलकरंजी येथे यंत्रमागधारकांने केलेली आत्महत्या अशा बाबी आमदार सुरेश हाळवणकर यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे उपस्थित करत *प्रती यंत्रमागास अनुदान द्यावे, यंत्रमागधारकांच्या कर्जावरील व्याज अनुदान सरकारने भरावे,* खर्चीवाले यंत्रमागधारकांना यंत्रमाग महामंडळामार्फत बिमांचा पुरवठा करावा, कर्नाटक व इतर राज्याप्रमाणे *यंत्रमागास प्रती युनिट एक रूपये दराने वीज पुरवठा* करावा आदी मागण्या केल्या.

    राज्यातील सूत गिरण्यांना सरकारने भागभांडवल दिले असून त्यामागे राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन विणकरांना सुताचा पुरवठा व्हावा, असा उद्देश आहे. त्यामुळे सुतगिरण्यांमध्ये उत्पादित होणारे सूत राज्यातील यंत्रमागधारकांना विक्री करण्याचे बंधन घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.

    लक्षवेधीच्या उत्तरामध्ये मंत्री देशमुख यांनी, राज्य सरकार सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगून या सर्व मागण्यांबाबत मंत्री मंडळासमोर जाऊन मंजुरी घेण्याचे आश्वासन दिले. *चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात होत असलेल्या गारमेंटवर कर आकरणी करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करणार* असल्याचेही त्यांनी सांगितले.

    *©पद्मकमळ*

    ReplyDelete
  3. *रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा...*


    रिलायन्सची बहुप्रतिक्षित जिओ 4 जी सेवा आज लाँच झाली आहे. जिओ सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत एसटीडी कॉल्स आणि डाटा सेवा मोफत देण्यात येईल, अशी घोषणाही रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे.

    मुंबईतील रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी जिओ 4 जी सेवा लाँच केली. लाँचिंगसोबत सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अंबानी यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे.

    *काय आहेत जिओची वैशिष्ट्ये?*

    आयुष्यभरासाठी आऊटगोईंग कॉलिंग फ्री. STD, लोकल कॉल लाईफटाईम फ्री
    आयुष्यभरासाठी रोमिंग फ्री
    ब्लॅकआऊट डे नाही म्हणजे सण, उत्सवाला SMS, कॉल दर वाढणार नाही.
    डेटासाठी जास्त गरज नाही
    विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के वाढीव डेटा
    डिसेंबरपर्यंत डेटा मोफत, त्यानंतर केवळ 50 रुपयात 1GB 4G डेटा

    या स्मार्टफोनवर चालेल जिओ 4G
    रिलायन्स जिओने काही स्मार्टफोन्ससाठी खास 4G ऑफर आणली आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. रात्री 2 वाजल्यापासून लोक रांगा लावत आहेत. *सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, असुस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ* या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.

    काय आहे जिओची ऑफर?

    रिलायन्स जिओ 4G सेवेची चाचणी करत आहे. यासाठी *रिलायन्स LYF ब्रँडच्या सर्व फोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा* देत आहे. जिओ सिम सक्रिय झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही ऑफर आहे.

    या ऑफरसोबतच जिओकडून प्रिमियम अॅप सेवा देखील देण्यात येत आहेत. *जिओ प्ले, जिओ एक्स्प्रेस न्यूज, जिओ ड्राईव्ह, जिओ सिक्युरिटी आणि जिओ मनी अशा ऑफर्स सुरु आहेत. जिओ ऑन डिमांड ऑफरअंतर्गत टीव्ही शो, लाईव्ह टीव्ही* आणि गाण्यांसाठी बीट्स उपलब्ध आहेत.

    असं मिळवा जिओ सिम
    *गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करावं.
    त्यानंतर get jio sim>agree>get jio offer>location>next button>
    ही प्रोसेस केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल.* ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरला भेट द्या.

    *©पद्मकमळ*

    ReplyDelete
  4. *२०१९साठी पंतप्रधानपदी ७० टक्के भारतीयांची मोदींनाच पसंती...*

    २०१९ मध्येही नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहायला ७० टक्के भारतीयांनी पसंती दिली आहे. *न्यूज अॅप 'इनशॉर्ट्स' आणि मार्केट रिसर्च कंपनी इप्सासनं हा सर्व्हे केला आहे.*
    या सर्व्हेमध्ये ६३,१४१ जणांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता. यातल्या ७० टक्के जणांना मोदीच २०१९ मध्ये पंतप्रधान हवे आहेत, *तर १७ टक्के नागरिकांनी याला विरोध दर्शवला आहे.* १३ टक्के नागरिकांनी याबाबत कोणतंही मत दिलेलं नाही.  २५ जुलै ते ७ ऑगस्टमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता.  या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या ८०टक्के जणांचं वय ३५ आणि त्यापेक्षा कमी होतं. 
    मागच्या दोन वर्षांमध्ये *दलित आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार* वाढल्याचं ३३ टक्के नागरिकांना वाटत आहे, तर *४६ टक्के नागरिकांनी हे आरोप फेटाळून लावले* आहेत. २२ टक्के नागरिकांनी याबाबत कोणतंही मत व्यक्त केलं नाही. 
    *सर्व्हेमधल्या ५७ टक्के नागरिकांना राज्यांमध्ये दारूबंदी असावी असं वाटत* आहे. तर विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांना ६१ टक्के नागरिकांनी विरोध केला आहे. अशा निवडणुका व्हाव्यात असं ३२ टक्के नागरिकांना वाटत आहे. सात टक्के लोकांनी याबाबत कोणतंही मत व्यक्त केलेलं नाही. 

    *©पद्मकमळ*

    ReplyDelete