Sunday, June 8, 2025

विमानसेवा सुरू झाले

 सोलापूर विमानतळाला DGCA ने SSE कोड देणं, खूपच आनंददायी आहे. यामुळे सोलापूर विमानतळ आता विमानसेवा जागतिक नकाशावर दिसणार आहे. सोलापूर-गोवा फ्लाय 91 एअर अलायन्स विमानसेवा आजपासून सुरू होत आहे. 

     सोलापूर विमानतळाचे नुतनीकरण व प्रत्यक्ष विमानसेवा स्वप्न साकार करण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील मोदी सरकार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे विशेष आभार.!

Monday, January 2, 2023

आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून कर्णिक नगर येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयास दोन लाख रुपये रुपयांचे 'ग्रंथसंपदा' तब्बल साडेआठशे पुस्तके देण्यात आले.

 आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून कर्णिक नगर येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयास दोन लाख रुपये रुपयांचे 'ग्रंथसंपदा' तब्बल साडेआठशे पुस्तके देण्यात आले.

 माननीय आमदार यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम ग्रंथसंपदा पुस्तकांचे पूजन करण्यात आले.

 माननीय आमदार शिंदे ताईंचे पुष्प बुके, शाल व पुस्तक भेट देऊन संस्थेकडून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बार कौन्सिल चे अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड साहेब यांची प्रमुख उपस्थिती होते. आलेल्या पाहुण्यांचे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आला.

       कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक काजळे सर यांनी संस्थेच्या कारभाराविषयी मनोगत व्यक्त करताना ग्रंथालयाला स्थायी जागा व बांधकाम आपल्या निधीतून आम्हाला करून मिळावे अशी विनंती करण्यात आली. 

त्यानंतर वाचनालयाचे सचिव माननीय श्री गोपीकृष्ण वड्डेपल्ली व संस्थेचे खजिनदार देवकर सर यांनी आपले विचार मांडले. 

         याकार्यक्रमास संचालक आळदे साहेब, रमेश कंदीकटला, श्रीनिवास नल्ला दिगंबर कुरापाटी, पाटील साहेब, लेखनिक जाधव मॅडम सेवक रवी केने व गायकवाड उपस्थिती होती. 

      सदर कार्यक्रमास संस्थेचे आजीव सदस्य, कर्णिक नगर भागातील असंख्य वाचक वर्ग ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. वाचनालयास आहे त्या जागेवर सभामंडप बांधून देण्याची विनंती मान्य करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती केणे यांनी केले आभार प्रदर्शन नरसिंग मिसालोलू यांनी केले.


 उत्कर्ष सार्वजनिक वाचनालय..

Sunday, June 7, 2020

पूर्व विभाग भाजपच्या वतीने माजी नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली यांच्या नेतृत्वाखाली झोपलेल्या तिघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी "माझे आंगण, रणांगण" हे आंदोलन..

पूर्व विभाग भाजपच्या वतीने माजी नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली यांच्या नेतृत्वाखाली झोपलेल्या तिघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी "माझे आंगण, रणांगण" हे आंदोलन..

कोरोनाच्या नियंत्रणात महाविकासआघाडी सरकार अपयशी ठरल्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, या सरकारला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलन सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून पूर्व विभाग भाजपच्या वतीने माजी नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी

 राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपातर्फे आज राज्यभरात 'महाराष्ट्र बचाओ' आंदोलन करण्यात येत आहे. आज भाजपाच्या सायन कार्यालयाबाहेर फलक झळकवत आंदोलनात कार्यकर्त्यांसह भाग घेतला.

Friday, October 20, 2017

रतन टाटांचं रुग्णांना दिवाळी गिफ्ट, पाच राज्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार...

रत टाटांचं रुग्णांना दिवाळी गिफ्ट, पाच राज्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार...

कॅन्सर या दुर्धर रोगावर गरिबातल्या गरिबाला इलाज करता यावा यासाठी टाटा ट्रस्ट मोठं पाऊल उचलणार आहे. आता झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही टाटाची नवी रुग्णालयं सुरु होणार आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे कॅन्सरचं सर्वात प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध रुग्णालय समजलं जातं.



*आसाम, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये* बनणाऱ्या कॅन्सर रुग्णालयात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा असतील. यामुळे या राज्यांमधील रुग्णांवर तिथेच उपचार होतील.

*मुंबईत उपचार महाग*
टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल 60 टक्के कॅन्सरग्रस्तांना मोफत उपचारांसह नि:शुल्क सल्लाही देतं. ज्या रुग्णांकडे उपचारांसाठी पैसे नसतात, ते बहुतांश मुंबईत उपचारांसाठी येतात. पण मुंबईसारख्या महागड्या शहरात येऊन उपचार घेणं सगळ्याच कॅन्सरग्रस्तांना शक्य नसतं. ही अडचण पाहून पाच राज्यांमध्ये टाटांनी नवी रुग्णालयं सुरु करण्याची घोषणा केली आहे.

*1000 कोटी रुपये खर्च*
कॅन्सर हॉस्पिटल सुरु करण्यासाठी रतन टाटा यांनी एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या पैशांमधून वैद्यकीय उपकरणं आणि इतर आवश्यक साधनं खरेदी केली जातील. डॉक्टर आणि नर्स स्टाफ टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून प्रशिक्षण घेतील.

जयपूर कॅन्सर हॉस्पिटलसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. *रांची आणि झारखंडमध्ये हॉस्पिटलसाठी टाटा ट्रस्टने 23.5 एकर जमीन* घेतली आहे. उत्तर प्रदेशासाठी वाराणसीमध्ये इंडियन रेल्वे कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि संशोधन संस्था अपग्रेड केलं जाईल.

*आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टला 25 एकर जमीन* कॅन्सर हॉस्पिटलसाठी दिली आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की, मुंबईबाहेरही अन्य राज्यांमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उघडली तर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा होईल.

*©पद्मकमळ*

Wednesday, April 26, 2017

कामगार कायदा आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही लागूः* कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख.

*कामगार कायदा आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही लागूः* कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख.

राज्यातील विविध सहकारी संस्थामध्ये सुरक्षा रक्षक आणि कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले. सदर *कायद्याद्वारे मिळणारे विविध लाभ प्राप्त करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचवण्यासाठी हा कामगार कायदा आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही लागू करण्यात येणार.*
त्यामुळेच अशा खासगी सुरक्षा रक्षकांची नोंदणी संस्थांच्या कार्यकक्षेत आणली जाणार आहे. त्यामुळेच अशा सुरक्षा रक्षकांना संरक्षण देण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी केल्याने अंमलबजावणी यंत्रणा सक्षम होऊ शकेल.

ज्या कारखान्यात व आस्थापनेत खाजगी संस्थेमार्फत सुरक्षा रक्षक नेमण्‍यात येत आहेत. यांची नोंदणी करण्याकरिता लगतच्या *दिवसात ६० दिवस व त्यापेक्षा जास्त दिवस काम केले आहे त्यांनी मंडळाकरिता नोंदणी अर्ज करावे* जेणे करुन त्यांची नोंदणी होईल. अशी नोंदणी न करणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळांवर व आस्थापनेच्या मुख्य मालकावर गृह विभागातर्फे कारवाई करण्यात येईल.

*©पद्मकमळ*

Monday, April 3, 2017

एसबीआय कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के कपात...

*एसबीआय कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के कपात...*

स्टेट बँकेने कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के इतकी कपात केली असून प्रमाण व्याजदर 9.10 टक्के केला आहे.  यामुळे वाहन कर्जे व गृहकर्जासारखी कर्जे स्वस्त होतील आणि आधीच्या कर्जदारांचाही हप्ता कमी होईल.

या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेची ही व्याजदर कपात सूचक मानण्यात येत आहे. स्टेट बँकेचा कर्ज देण्यासाठी असलेला आधार दर किंवा प्रमाण दर *9.25 टक्के होता जो आता 1 एप्रिलपासून 9.10 टक्के* झाला आहे.

*©पद्मकमळ*

Saturday, April 1, 2017

यंत्रमागात सबसिडी 30 टक्यांनी वाढ- स्मृती इराण

*°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°*
*यंत्रमागात सबसिडी 30 टक्यांनी वाढ- स्मृती इराणी*

*राज्यातील यंत्रमागांसाठी वीज दर सवलतीसंदर्भात योजनेची आखणी- मुख्यमंत्री*

यंत्रमागाचा दर्जा वाढविताना देण्यात येणारी सबसिडी 30 टक्यांनी वाढविली आहे, *ग्रुप वर्क शेड* या योजनेत कामगारांसाठी विश्रांती घेण्यासाठी व राहण्यासाठी व्यवस्था असेल, आता *11 जण एकत्र येऊन यार्न बँक स्थापन करु शकतात.* अशी बँक आता ज्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही अशा व्यक्ती देखील स्थापन करु शकतील. यासाठीची गॅरंटी कमी करून 25 टक्के केली आहे, यात कॉमन सर्व्हिस सेंटर्स असतील, *प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देतांना 4 टक्के इतक्या कमी व्याज* दराने परतफेड करता येईल 1 लाख रुपयांचा मार्जीन मनी देखील शासन देईल. लवकरच पॉवरटेक्स चे एक मोबाईल एप काढण्यात येऊन त्यातून या योजनेची सर्व प्रकारची माहिती देण्यात येईल.

१८००२२२०१७ या पॉवरटेक्स हेल्पलाईन.

*©पद्मकमळ*