Monday, January 2, 2023

आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून कर्णिक नगर येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयास दोन लाख रुपये रुपयांचे 'ग्रंथसंपदा' तब्बल साडेआठशे पुस्तके देण्यात आले.

 आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून कर्णिक नगर येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयास दोन लाख रुपये रुपयांचे 'ग्रंथसंपदा' तब्बल साडेआठशे पुस्तके देण्यात आले.

 माननीय आमदार यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम ग्रंथसंपदा पुस्तकांचे पूजन करण्यात आले.

 माननीय आमदार शिंदे ताईंचे पुष्प बुके, शाल व पुस्तक भेट देऊन संस्थेकडून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बार कौन्सिल चे अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड साहेब यांची प्रमुख उपस्थिती होते. आलेल्या पाहुण्यांचे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आला.

       कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक काजळे सर यांनी संस्थेच्या कारभाराविषयी मनोगत व्यक्त करताना ग्रंथालयाला स्थायी जागा व बांधकाम आपल्या निधीतून आम्हाला करून मिळावे अशी विनंती करण्यात आली. 

त्यानंतर वाचनालयाचे सचिव माननीय श्री गोपीकृष्ण वड्डेपल्ली व संस्थेचे खजिनदार देवकर सर यांनी आपले विचार मांडले. 

         याकार्यक्रमास संचालक आळदे साहेब, रमेश कंदीकटला, श्रीनिवास नल्ला दिगंबर कुरापाटी, पाटील साहेब, लेखनिक जाधव मॅडम सेवक रवी केने व गायकवाड उपस्थिती होती. 

      सदर कार्यक्रमास संस्थेचे आजीव सदस्य, कर्णिक नगर भागातील असंख्य वाचक वर्ग ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. वाचनालयास आहे त्या जागेवर सभामंडप बांधून देण्याची विनंती मान्य करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती केणे यांनी केले आभार प्रदर्शन नरसिंग मिसालोलू यांनी केले.


 उत्कर्ष सार्वजनिक वाचनालय..

No comments:

Post a Comment