Wednesday, December 28, 2016

महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या १०८ होमहवन कुंड सहस्त्र चंडी याग

~~~~~~~~~~~~~~~~~~

महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या १०८ होमहवन कुंड *सहस्त्र चंडी याग २०१७ समितीची नियोजनपूर्वीची प्रकट मुलाकात* सोलापुरात अल्पावधीतच नावाजलेल्या *स्वरांजली चॅनेल वर 'मनुसोलो माटा' या कार्यक्रमात...*

*विषय-* महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या १०८ होमहवन कुंड सहस्त्र चंडी याग २०१७...

*सहभाग-* कार्याध्यक्ष-लक्ष्मीकांत ठोंगे पाटील (शिवसेना जिल्हाप्रमुख)
संयोजक-
पं वेणुगोपाल जिल्ला पंतुलू व
पं. विष्णुसुदर्शना जिल्ला पंतुलू
सरचिटणिस- पुरुषोत्तम उडता
सहचिटणिस- श्रीनिवास जोग व
खजिनदार-गोपीकृष्ण वड्डेपल्ली.

*निवेदन-* नारायण येरवा

*तारीख व वेळ-* गुरुवार  दि. २८/१२/१६ रोजी रात्री ९:०० व
शुक्रवारी सकाळी ९:३० व
दुपारी १:३० वाजता

*चॅनल नंबर-* इन केबल- ५९९
डेन केबल- ८८८ नंबर वर.

पाहायला विसरू नका व आपल्या प्रतिक्रिया कळवा

               आपला

   *(सहस्त्र चंडी याग समिती)*

Monday, December 26, 2016

ओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारची मान्यता...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारची मान्यता...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारची मान्यता देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला. याआधी ओबीसी हा विभाग समाजकल्याणमध्ये समाविष्ट होता. आता स्वतंत्र विभाग असल्याने ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींना याचा फायदा होणार आहे. तीन महिन्यांच्या आत सर्व पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

*नवे ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याची प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण* करण्यात येणार आहे. आता राज्यात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असल्याने  स्वंतत्र मंत्र्यांसह, स्वतंत्र सचिव, उपसचिव अशी ५२ नवी पदे भरण्यात येणार आहे. *सामाजिक न्याय विभागाकडून नस्त्या हस्तांतरीत* करण्यात येणार आहेत. ओबीसी महामंडळ खात्याकडे वर्ग केले जाईल. तर मंत्रालयात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणार आहे.

©पद्मकमळ

Sunday, December 25, 2016

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आता आधार कार्ड बंधनकारक... कार्यकारी अधिकारी डी संबाशिव राव

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आता आधार कार्ड बंधनकारक... कार्यकारी अधिकारी डी संबाशिव राव

तिरुपती बालाजी मंदिरातील सोयी-सुविधांचा भाविकांकडून गैरवापर होत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर आधार कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याचं मंदिर प्रशासनाने सांगितले.

*ज्या भाविकांकडे आधार कार्ड नसेल, त्यांना तिरुपती बालाजीचं फक्त मुखरदर्शन* घेता येणार आहे. गाभाऱ्यात प्रवेश करायचा असल्यास आणि *प्रसाद हवा असल्यास आधारकार्ड सोबत ठेवावंच लागेल.*
अगदीच काही अपवादात्मक कारण असेल, तर आधारकार्ड दाखवण्याला सूट देण्यात येईल. मात्र, तेव्हाही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र दाखवून दर्शन घेता येणार आहे.

तिरुपतीमधील तिरमाला डोंगरावर असलेल्या या बालाजी व्यकंटेश मंदिराला विशेष महत्व आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भारतातील श्रीमंत देवस्थानांमध्येही तिरुपती बालाजी व्यंकटेश मंदिराची गणना होते.

©पद्मकमळ

Saturday, December 24, 2016

आता पासपोर्ट काढणे आणखी सुलभ आणि सोपं...*परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

##################
*आता पासपोर्ट काढणे आणखी सुलभ आणि सोपं...*परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज
नव्या नियमानुसार पासपोर्ट *अर्जदाराला आता त्यांच्या वेळेनुसार अपॉइंटमेंट* घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पासपोर्ट अॅप प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी आपला रिपोर्ट थेट अपलोड करतील.
अवघ्या चार कागदपत्र/ओळखपत्रांवर पासपोर्ट मिळू शकणार आहे.  तसंच *पासपोर्ट मिळाल्यानंतर पोलिस व्हेरिफिकेशन* करण्यात येणार आहे.

*आवश्यक कागदपत्रांमध्ये –*
1)आधार कार्ड,
2)निवडणूक ओळखपत्र,
3) पॅन कार्ड आणि
4) कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं प्रतिज्ञापत्र.
नव्या नियमांमुळे अवघ्या *आठवडाभरात पासपोर्ट मिळणं शक्य* आहे.
*©पद्मकमळ*

Thursday, December 22, 2016

Check out @Dev_Fadnavis's Tweet: https://twitter.com/Dev_Fadnavis/status/811906269812404224?s=09

Tuesday, December 20, 2016

देशातील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात गेल्या सहा महिन्यात 68 हजार कोटींची गुंतवणूक देशातील एकूण गुंतवणुकीच्या 50 टक्के गुंतवणूक

++++++++++++++++++++++++

देशातील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात गेल्या सहा महिन्यात 68 हजार कोटींची गुंतवणूक

देशातील एकूण गुंतवणुकीच्या 50 टक्के गुंतवणूक

        महाराष्ट्रात उद्योगवाढीसाठी अतिशय चांगले वातावरण असून सर्व प्रकारच्या मुलभूत सोयी उपलब्ध होत आहेत. *मुंबईच्या पाठोपाठ नागपूर येथे मेट्रो सुरु होत आहे.* रस्त्याचे जाळे आणि शासनाच्या सहज उपलब्ध होणाऱ्या ऑनलाईन सुविधामुळे गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रातील *उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक* झाली असून यापुढेही ती गती अशीच कायम राहील.

*विदर्भ आणि मराठवाडा या विभागासाठी पॉवर टेरिफ पॉलिसी उपलब्ध करुन दिली* असल्यामुळे या भागात उद्योग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योजक येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

*राज्यात कृषी, कृषीपूरक उद्योग, सेवा उद्योग यासाठी मोठी संधी* असून या महामार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता, मुबलक पाणी असल्यामुळे अमरावतीत कॉटन पार्कमध्ये अनेक मोठमोठ्या उद्योगांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. अशाच प्रकारचे *नऊ कॉटन पार्क येत्या काळात उभे राहणार* असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे उद्योगांचे मोठे जाळे उभे राहणार आहे.

©पद्मकमळ

"२२ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन"

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
             *|| निमंत्रण ||*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

  _*बृहन् महाराष्ट्र मंडळ आयोजित*_

*"२२ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन"*

_या अधिवेशन मधे विविध ज्योतिषी विषयावर मान्यवरांच्या चर्चासत्र, शास्त्रातील नामवंत ज्योर्तिवेदांचा गौरव, उत्कृष्ट वक्ता व ज्योतिषी संस्थाना पुरस्कार, सोलापूर शहरातून ज्योतिष दिंडी निघणार आहे. तीन दिवस ज्योतिषी मेजवानींचा आस्वाद घेता येईल._

*दिनांकः*२४, २५ व २६ डिसेंबर १६

*स्थळः* कै. धुंडिराजशास्त्री दाते नगर, सुशील रसिक सभा, मोरारजी पेठ, सोलापूर.

                    
               आपला विनित

                *प्रदीप जाधव*
        (संयोजन समिती अध्यक्ष)

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Sunday, December 18, 2016

भाजपा शहर मध्य मंडलचे सरचिटणीस श्रीनिवास जोगी यांच्या मित्र परिवार तर्फे 'स्नेह मेळावा' आयोजित

भाजपा शहर मध्य मंडलचे सरचिटणीस श्रीनिवास जोगी यांच्या मित्र परिवार तर्फे 'स्नेह मेळावा' आयोजित

स्नेह मेळावा प्रसंगी श्रीनिवास जोगी यांचा सत्कार करताना भाजपा उपाध्यक्ष मा. नगरसेवक मधुकर वडनाल, मंडल अध्यक्ष दत्तु पोसा, पिंटू महाले, संजय गांधी निराधार कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम पोबत्ती, सदस्य गोपीकृष्णा वड्डेपल्ली, भाजपा चिटणीस जयजी साळुंखे, हिरालाल पिसे, बस्सु गदगे, नागेश गंजी, व्यंकटेश कोंडी, श्रीनिवास पुरुड, अंबादास लोकुर्ते, नागेश पासकंटी, प्रभाकर गणपा, श्रीनिवास आगनूर व शहरातील सामाजिक संघटना सदस्य व श्रीनिवास जोगी यांचे मित्र परिवार आदी उपस्थिती होते.

*©पद्मकमळ*

महिलांसाठी आता महिलाच चालवणार ‘पिंक ऑटोरिक्षा'...परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख

महिलांसाठी आता महिलाच चालवणार ‘पिंक ऑटोरिक्षा'...परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख

५४८ स्त्रियांना रिक्षा चालवण्याचे परवाने मिळाले आहेत. पैकी ४६५ मुंबईतील आहेत.
गुडगाव, इंदौर आणि रांची नंतर आता मुंबई/महाराष्ट्रातसुद्धा स्त्रिया रिक्षा चालवणार आहेत.

त्यामुळे आता स्त्रियांना सार्वजनिक वाहतुकीत एक सुरक्षित आणि विश्वासू पर्याय तर निर्माण होत आहेच, शिवाय अनेक स्त्रियांना रोजगाराचा एक नवा मार्ग उपलब्ध होतोय. सध्या ३५६२८ रिक्षा परवाने मुंबईसाठी आणि ६०००, मुंबईसोडून इतर भागांत देणं सुरु आहे.

ह्यापैकी ५% परवाने स्त्रियांसाठी राखीव आहेत. त्यामुळे एकूण १७८१ परवाने मुंबईतील स्त्रियांना दिले जाणार आहेत.
अंधेरी RTO तर्फे मुंबईतील ४६५ महिलांना लॉटरी पद्धतीने परवाने देण्यात आले आहेत.

महाराष्टातील एकूण ५४८ स्त्रियांना आत्तापर्यंत परवाने दिले गेले आहेत आणि उर्वरित १३१६ परवाने फक्त स्त्रियांनाच दिले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक महिलांनी परवान्यांसाठी अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

©पद्मकमळ

Saturday, December 17, 2016

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे ३५५ अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे ३५५ अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती गोपीकृष्णा वड्डेपल्ली सदस्य संजय गांधी निराधार व श्रावणबाळ अनुदान योजना समिती यांनी दिली.

येथील तहसील कार्यालयात गुरुवार व शुक्रवारी (ता. १५ व १६) संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची शहरी विभागअंतर्गत बैठक घेण्यात आली. या वेळी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे ३५५ अर्ज निकाली काढण्यात आले.

सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर भागातील १ सप्टेंबर ते ९ डिसेंबर २०१६ याकालावधीतील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे हे सर्व अनुदान वाटप तहसील कार्यालयात सुरू आहे.
अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे मध्य अध्यक्ष पुरुषोत्तम पोबत्ती, व शहर उत्तर अध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर यांनी बैठकीत दिली.

या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य गोपीकृष्णा वड्डेपल्ली, आनंद बिर्रु हिरालाल पिसे, जय साळुंखे, लक्ष्मीकांत कोंडा, राजू अलकोड, कैयावाले उत्तर सदस्य भगवान परळीकर, प्रमोद म्याकल, राजू आलुरे व  तहसीलदार अरुणा गायकवाड तलाठी येवगाकर म्याडम, खंदारे म्याडम  शिपाई झुंजर उपस्थित होते.

*©पद्मकमळ*

Friday, December 16, 2016

एसटी'ला सक्षम करण्यासाठी कृती आराखडा तयार...परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख

*'एसटी'ला सक्षम करण्यासाठी कृती आराखडा तयार...*_परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख_

     : राज्य परिवहन महामंडळाला अनेक खात्यांकडून निधी मिळालेला नाही. तब्बल दोन हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. दरम्यान, याबाबत शासन गांभीर्याने विचार करीत असून *सर्व उत्तरदायित्व परिवहन खात्याने घेतले आहे, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख* यांनी दिली. विधानपरिषद सदस्य भाई गिरकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतचा प्रश्न विचारला होता.

त्यावर उत्तर देताना विभागाचे राज्यमंत्री देशमुख यांनी पालघर विभागाला २.८५ लाखांचा तोटा झाला आहे. हा परिसर डोंगराळ असल्याने *एसटी वाहतुकीचा देखभाल खर्च मोठय़ा प्रमाणात वाढतो.* यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शासनाकडून महामंडळाला किती येणे बाकी आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, अनेक खात्यांकडून पैसे येणे बाकी आहेत. मात्र सर्व उत्तरदायित्व परिवहन खात्याने घेतले आहे.

*एसटीत विविध घटकांना सवलती दिल्या जातात.* सवलतीचे मूल्य एकरकमी महामंडळाला दिले जाईल. रिक्त असणारी पदे भरली जातील. कोकण विभागाकरिता स्वतंत्र भरती केली जाईल. *परिवहन ही सेवा असून त्यात नफ्या-तोट्याचा विचार न करता प्रत्येकापर्यंत गाडी पोहोचविण्याचा प्रयत्न* असल्याचे रावते यांनी अधोरेखित केले. आनंद ठाकूर, भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनी चर्चेत भाग घेतला.

©पद्मकमळ

Thursday, December 15, 2016

राज्यात बंद पडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार...

राज्यात बंद पडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार...

1 जुलै 2016 पासूनच्या वीजदारात प्रति युनिट 1 रुपये सवलत

कर्जाचा 5 टक्के व्याजाची सवलत 5 वर्षांकरीता देण्याबाबतचा प्रस्ताव
   
    
        राज्यातील जवळपास 90 हजार यंत्रमाग धारकांना दिलासा देण्यासाठी *15 दिवसाच्या आत मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार* असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या सुचनेवर उत्तर देताना सांगितले.

राज्यातील यंत्रमागधारकांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा 5 टक्के व्याजाची सवलत 5 वर्षांकरीता देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे देण्यात आला आहे. तसेच साध्या यंत्रमाग धारकांना 1 जुलै 2016 पासूनच्या वीजदारात प्रति युनिट 1 रुपये सवलत देण्याचा प्रस्तावही ऊर्जा विभागाने वित्त विभागाला दिला आहे.

*हा प्रस्ताव अधिवेशन संपल्यानंतर लगेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर* करून मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनावर समाधान व्यक्त करत, समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी सांगितले की शासनाच्या वतीने यंत्रमाग धारकांसाठी जो प्रयत्न होत आहे, त्यामुळे *यंत्रमाग धारकांच्या कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निश्चित सुटणार* आहे.

©पद्मकमळ

दुसऱ्या टप्प्यातील नगर परिषद निवडणूक निकाल..

_*दुसऱ्या टप्प्यातील नगर परिषद निवडणूक निकाल..*_

*👉🏻नगर अध्यक्ष- 14*

*🌷भाजपा- 5*🖕
✋🏻कॉग्रेस- 3
⏰राष्ट्रवादी- 2
🚩शिवसेना- 1
🤗इतर- 3

*👉🏻नगरसेवक- 341*

*🌷भाजपा- 100*
⏰राष्ट्रवादी- 99
✋🏻काँग्रेस- 64
🚩शिवसेना- 28
🤗इतर- 50

*पुन्हा एक नंबर भाजपा*🌷

*©पद्मकमळ*

Tuesday, December 13, 2016

सोलापुरात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शन

सोलापुरात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शन

देशातील ६००० रिटेलर्स या प्रदर्शनाला भेट देणे अपेक्षित

     : भारतातील पहिले गणवेश आणि वस्त्र उत्पादकांचे तीन दिवसांचे प्रदर्शन सोलापूर येथे ५ ते ७ जानेवारी २०१७ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाने या प्रदर्शनाचे यजमानपद स्वीकारले असून, त्याला महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभाग आणि *प्रायोजकत्व मफतलाल फॅब्रिक्स*चे सहकार्य आहे. देशभरातील ६०००रिटेलर्स या प्रदर्शनाला भेट देणे अपेक्षित आहे.

गणवेश उत्पादक उद्योगचा आकार हा *साधारण १८ हजार कोटींचा* असून त्यातील १० हजार कोटी हे उत्पादक क्षेत्राकडून येतात. साधारण ८००० कोटी हे स्थानिक शाळांना स्थानिक रिटेल विक्रेत्यांकडून आणि संस्थांकडून पुरवले जाणार्‍या गणवेशांतून येतात. त्याचबरोबर *स्थानिक शिंप्यांकडूनही ही गणवेश शिवले जातात.* त्यातून बर्‍याचदा अडचणीही उभ्या राहतात. सोलापूरमध्ये शालेय गणवेश, मुलांचे कपडे, पुरुष आणि स्त्रियांचे कपडे यासाठी फार मोठय़ा प्रमाणावर मागणी वाढत आहे.

©पद्मकमळ

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन

••••••••••••••••••••••••••••••••••
सोलापूर शहर मध्य व शहर उत्तर
१ सप्टेंबर ते ९ डिसेंबर २०१६ याकालावधीतील अर्जदार
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन
सोलापूर शहर मध्य व शहर उत्तर मधील ज्या अर्जदारांनी संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज केला आहे. अशा लाभार्थ्यांनी *श्री छत्रपती रंगभवन, डायनिंग हॉलमध्ये जिल्हा परिषद जवळ याठिकाणी ३० नोव्हेंबर व ९ डिसेंबर* याकालावधीत अर्जांची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
*१ सप्टेंबर ते ९ डिसेंबर २०१६ याकालावधीत संजय गांधी अर्ज केलेल्या* अर्जदारांसाठी ३० नोव्हेंबर तर ९ डिसेंबर रोजी श्रावणबाळ योजनेसाठी *सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत* अर्जावर कार्यवाही करणे सोयीचे होईल.
संबंधितांनी यावेळी कार्यालयाकडे सादर केलेल्या *अर्जाची पोहोच, मूळ कागदपत्रांच्या प्रति, राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक, आधारकार्डच्या मूळ व झेरॉक्स प्रतिसह* लाभार्थींनी उपस्थित राहावे.
असे आवाहन संजय गांधी योजना शहर सोलापूरच्या तहसीलदार अरुणा गायकवाड.
    

   गोपीकृष्णा तुकाराम वड्डेपल्ली
सदस्य-संजय गांधी निराधार व श्रावणबाळ अनुदान योजना समिती, सोलापूर. संपर्कः ९३७१३४६८१०
••••••••••••••••••••••••••••••••••

Saturday, December 10, 2016

महाविद्यालयीन विदयार्थी निवडणूका पुन्हा सुरु होणार

*नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायदा*

*महाविद्यालयीन विदयार्थी निवडणूका पुन्हा सुरु होणार*

*विद्यार्थ्यांसाठी कल्याण मंडळ व तक्रार निवारण कक्ष*

विद्यार्थी विकास मंडळ तयार केले जाणार असून विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी विकास कक्ष व विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्याची तरतूद प्रस्तावित कायद्यात करण्यात आली आहे क्रीडाक्षेत्रातील नवीन योजना  राबवण्यासाठी क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाची स्थापना.

विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष नेमणार विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी योजना राबवण्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ तयार केले जाणार आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी विकास कक्ष तसेच विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

*©पद्मकमळ*

यंत्रमाग उद्योगाला भरभक्कम पॅकेज जाहीर करण्याची तयारी....*वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*लोकसभेचे अधिवेशन संपताच यंत्रमाग उद्योगाला भरभक्कम पॅकेज जाहीर करण्याची तयारी....*वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी

यंत्रमाग उद्योगावर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकार लोकसभेचे अधिवेशन संपताच दोन आठवड्यातच भरभक्कम पॅकेज जाहीर करण्याची तयारी करीत आहे. अरब देशांना सर्वात जास्त कापडाची निर्यात करणारा चीन हा देश आहे. त्यानंतर भारताचा नंबर आहे.

चीनपेक्षा आपल्या देशात कापड स्वस्त किमतीत तयार व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या *व्यवसायासाठी लागणारी वीज स्वस्त* व विजेचे दर देशभरात एकसारखेच असावेत, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून *पॉवरलूम उद्योगाला मुद्रा योजनेतून कर्ज मिळण्याबरोबरच लूमयंत्र विकसित करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न* केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पॉवरलूम मजुरांचे बँक खाते व आधार कार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले.

संकटातील यंत्रमाग उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष होऊ लागल्याने *भिवंडी, मालेगाव, सोलापूर, इचलकरंजी येथील यंत्रमाग व्यावसायिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून पॉवरलूम उद्योगाची कैफियत मांडली होती.* त्यानुसार मंत्री स्मृती इराणी यांनी भिवंडीला भेट देऊन यंत्रमाग उद्योगाची समस्या जाणून घेतली आहे.

*©पद्मकमळ*

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना रिक्षा परवान्याचे वाटप


*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना रिक्षा परवान्याचे वाटप:* _परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख_

राज्यात नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा, कर्जफेडीचा तगादा या कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्येप्रकरणी मयत शेतकरी कुटुंबियांस महसूल व वन विभागाकडून तातडीची मदत देण्यात येते. अशा आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या या निर्णयान्वये *कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत रोजगारभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याची तरतूद* करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेअंतर्गत

शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरूष मयत झाल्याने अशा परिवारास चरितार्थचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध होण्याच्यादृष्टीने *शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावे विशेष बाब अ‍ॅटोरिक्षा परवाने* देण्याचा अद्यादेश गृह विभागाने २१ जानेवारी २0१६ रोजी जारी केला. त्याअन्वये राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयास परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. 

योजनेसाठी ६३ कुटुंबिय पात्र ठरले. या कुटुंबियांना आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांनी भेट देऊन माहिती दिली. यापैकी *३६ कुटुंबियांनी रिक्षा परवान्यासाठी अर्ज केले. त्यातील २२ जणांनी पैसे भरल्यावर त्यांना रिक्षा परमीट वितरित* करण्यात आले. ही योजना राबविण्यात सोलापूर आरटीओ कार्यालयात राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे ठरले आहे.

*©पद्मकमळ*

Friday, December 9, 2016

Digital India

*रोखमुक्त (CASH LESS) प्रचारासाठी मोदी सरकारचे नवे 'DigiShala' नावाचा TV चॅनेल...*

रोखमुक्त अर्थव्यवस्थेच्या प्रचाराला चालना देण्यासाठी सरकार माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 'डिजीशाला' नावाचा टी.व्ही चॅनल लॉन्च केला आहे. *डिजिशाला फ्री टू एयर चॅनल* आहे.

सरकारच्या डिजिशाला चॅनलची सुरूवात *लोकांना डिजिटल पेमेंट अर्थव्यवस्थेप्रति जागृकता निर्माण करण्यासाठी* करण्यात आला आहे. डीडी फ्री आणि डीटीएचवर चॅनेल दिसणार आहे. चॅनलने संभाव्य प्रेक्षक म्हणून दोन कोटी परिवार टार्गेटचा अनुमान ठेवला आहे.

*©पद्मकमळ*