Saturday, December 17, 2016

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे ३५५ अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे ३५५ अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती गोपीकृष्णा वड्डेपल्ली सदस्य संजय गांधी निराधार व श्रावणबाळ अनुदान योजना समिती यांनी दिली.

येथील तहसील कार्यालयात गुरुवार व शुक्रवारी (ता. १५ व १६) संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची शहरी विभागअंतर्गत बैठक घेण्यात आली. या वेळी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे ३५५ अर्ज निकाली काढण्यात आले.

सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर भागातील १ सप्टेंबर ते ९ डिसेंबर २०१६ याकालावधीतील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे हे सर्व अनुदान वाटप तहसील कार्यालयात सुरू आहे.
अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे मध्य अध्यक्ष पुरुषोत्तम पोबत्ती, व शहर उत्तर अध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर यांनी बैठकीत दिली.

या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य गोपीकृष्णा वड्डेपल्ली, आनंद बिर्रु हिरालाल पिसे, जय साळुंखे, लक्ष्मीकांत कोंडा, राजू अलकोड, कैयावाले उत्तर सदस्य भगवान परळीकर, प्रमोद म्याकल, राजू आलुरे व  तहसीलदार अरुणा गायकवाड तलाठी येवगाकर म्याडम, खंदारे म्याडम  शिपाई झुंजर उपस्थित होते.

*©पद्मकमळ*

No comments:

Post a Comment