*'एसटी'ला सक्षम करण्यासाठी कृती आराखडा तयार...*_परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख_
: राज्य परिवहन महामंडळाला अनेक खात्यांकडून निधी मिळालेला नाही. तब्बल दोन हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. दरम्यान, याबाबत शासन गांभीर्याने विचार करीत असून *सर्व उत्तरदायित्व परिवहन खात्याने घेतले आहे, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख* यांनी दिली. विधानपरिषद सदस्य भाई गिरकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतचा प्रश्न विचारला होता.
त्यावर उत्तर देताना विभागाचे राज्यमंत्री देशमुख यांनी पालघर विभागाला २.८५ लाखांचा तोटा झाला आहे. हा परिसर डोंगराळ असल्याने *एसटी वाहतुकीचा देखभाल खर्च मोठय़ा प्रमाणात वाढतो.* यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शासनाकडून महामंडळाला किती येणे बाकी आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, अनेक खात्यांकडून पैसे येणे बाकी आहेत. मात्र सर्व उत्तरदायित्व परिवहन खात्याने घेतले आहे.
*एसटीत विविध घटकांना सवलती दिल्या जातात.* सवलतीचे मूल्य एकरकमी महामंडळाला दिले जाईल. रिक्त असणारी पदे भरली जातील. कोकण विभागाकरिता स्वतंत्र भरती केली जाईल. *परिवहन ही सेवा असून त्यात नफ्या-तोट्याचा विचार न करता प्रत्येकापर्यंत गाडी पोहोचविण्याचा प्रयत्न* असल्याचे रावते यांनी अधोरेखित केले. आनंद ठाकूर, भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनी चर्चेत भाग घेतला.
©पद्मकमळ
No comments:
Post a Comment