Saturday, December 10, 2016

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना रिक्षा परवान्याचे वाटप


*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना रिक्षा परवान्याचे वाटप:* _परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख_

राज्यात नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा, कर्जफेडीचा तगादा या कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्येप्रकरणी मयत शेतकरी कुटुंबियांस महसूल व वन विभागाकडून तातडीची मदत देण्यात येते. अशा आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या या निर्णयान्वये *कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत रोजगारभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याची तरतूद* करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेअंतर्गत

शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरूष मयत झाल्याने अशा परिवारास चरितार्थचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध होण्याच्यादृष्टीने *शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावे विशेष बाब अ‍ॅटोरिक्षा परवाने* देण्याचा अद्यादेश गृह विभागाने २१ जानेवारी २0१६ रोजी जारी केला. त्याअन्वये राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयास परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. 

योजनेसाठी ६३ कुटुंबिय पात्र ठरले. या कुटुंबियांना आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांनी भेट देऊन माहिती दिली. यापैकी *३६ कुटुंबियांनी रिक्षा परवान्यासाठी अर्ज केले. त्यातील २२ जणांनी पैसे भरल्यावर त्यांना रिक्षा परमीट वितरित* करण्यात आले. ही योजना राबविण्यात सोलापूर आरटीओ कार्यालयात राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे ठरले आहे.

*©पद्मकमळ*

No comments:

Post a Comment