Saturday, December 10, 2016

यंत्रमाग उद्योगाला भरभक्कम पॅकेज जाहीर करण्याची तयारी....*वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*लोकसभेचे अधिवेशन संपताच यंत्रमाग उद्योगाला भरभक्कम पॅकेज जाहीर करण्याची तयारी....*वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी

यंत्रमाग उद्योगावर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकार लोकसभेचे अधिवेशन संपताच दोन आठवड्यातच भरभक्कम पॅकेज जाहीर करण्याची तयारी करीत आहे. अरब देशांना सर्वात जास्त कापडाची निर्यात करणारा चीन हा देश आहे. त्यानंतर भारताचा नंबर आहे.

चीनपेक्षा आपल्या देशात कापड स्वस्त किमतीत तयार व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या *व्यवसायासाठी लागणारी वीज स्वस्त* व विजेचे दर देशभरात एकसारखेच असावेत, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून *पॉवरलूम उद्योगाला मुद्रा योजनेतून कर्ज मिळण्याबरोबरच लूमयंत्र विकसित करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न* केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पॉवरलूम मजुरांचे बँक खाते व आधार कार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले.

संकटातील यंत्रमाग उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष होऊ लागल्याने *भिवंडी, मालेगाव, सोलापूर, इचलकरंजी येथील यंत्रमाग व्यावसायिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून पॉवरलूम उद्योगाची कैफियत मांडली होती.* त्यानुसार मंत्री स्मृती इराणी यांनी भिवंडीला भेट देऊन यंत्रमाग उद्योगाची समस्या जाणून घेतली आहे.

*©पद्मकमळ*

No comments:

Post a Comment