Tuesday, December 20, 2016

देशातील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात गेल्या सहा महिन्यात 68 हजार कोटींची गुंतवणूक देशातील एकूण गुंतवणुकीच्या 50 टक्के गुंतवणूक

++++++++++++++++++++++++

देशातील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात गेल्या सहा महिन्यात 68 हजार कोटींची गुंतवणूक

देशातील एकूण गुंतवणुकीच्या 50 टक्के गुंतवणूक

        महाराष्ट्रात उद्योगवाढीसाठी अतिशय चांगले वातावरण असून सर्व प्रकारच्या मुलभूत सोयी उपलब्ध होत आहेत. *मुंबईच्या पाठोपाठ नागपूर येथे मेट्रो सुरु होत आहे.* रस्त्याचे जाळे आणि शासनाच्या सहज उपलब्ध होणाऱ्या ऑनलाईन सुविधामुळे गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रातील *उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक* झाली असून यापुढेही ती गती अशीच कायम राहील.

*विदर्भ आणि मराठवाडा या विभागासाठी पॉवर टेरिफ पॉलिसी उपलब्ध करुन दिली* असल्यामुळे या भागात उद्योग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योजक येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

*राज्यात कृषी, कृषीपूरक उद्योग, सेवा उद्योग यासाठी मोठी संधी* असून या महामार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता, मुबलक पाणी असल्यामुळे अमरावतीत कॉटन पार्कमध्ये अनेक मोठमोठ्या उद्योगांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. अशाच प्रकारचे *नऊ कॉटन पार्क येत्या काळात उभे राहणार* असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे उद्योगांचे मोठे जाळे उभे राहणार आहे.

©पद्मकमळ

No comments:

Post a Comment