महिलांसाठी आता महिलाच चालवणार ‘पिंक ऑटोरिक्षा'...परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख
५४८ स्त्रियांना रिक्षा चालवण्याचे परवाने मिळाले आहेत. पैकी ४६५ मुंबईतील आहेत.
गुडगाव, इंदौर आणि रांची नंतर आता मुंबई/महाराष्ट्रातसुद्धा स्त्रिया रिक्षा चालवणार आहेत.
त्यामुळे आता स्त्रियांना सार्वजनिक वाहतुकीत एक सुरक्षित आणि विश्वासू पर्याय तर निर्माण होत आहेच, शिवाय अनेक स्त्रियांना रोजगाराचा एक नवा मार्ग उपलब्ध होतोय. सध्या ३५६२८ रिक्षा परवाने मुंबईसाठी आणि ६०००, मुंबईसोडून इतर भागांत देणं सुरु आहे.
ह्यापैकी ५% परवाने स्त्रियांसाठी राखीव आहेत. त्यामुळे एकूण १७८१ परवाने मुंबईतील स्त्रियांना दिले जाणार आहेत.
अंधेरी RTO तर्फे मुंबईतील ४६५ महिलांना लॉटरी पद्धतीने परवाने देण्यात आले आहेत.
महाराष्टातील एकूण ५४८ स्त्रियांना आत्तापर्यंत परवाने दिले गेले आहेत आणि उर्वरित १३१६ परवाने फक्त स्त्रियांनाच दिले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक महिलांनी परवान्यांसाठी अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
©पद्मकमळ
No comments:
Post a Comment